सामाजिक न्यायाच्या
विविध योजनांच्या स्टॉलचे
पालकमंत्री वर्षाताई
गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
हिंगोली, (जिमाका) दि. 01 : राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाच्या वतीने विविध आर्थिक विकास महामंडळे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,
आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या जनकल्याणकारी योजनांची
घडी पत्रिका, माहितीचा स्टॉल, 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्य साधून उभारण्यात आलेल्या स्टॉलचे पालकमंत्री वर्षाताई
गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले
.
येथील पोलीस परेड ग्राउंड वर 01 मे महाराष्ट्र
व कामगार दिनी ध्वजारोहणानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मीनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या जनकल्याणकारी
स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड , जिल्हा समाजकल्याण
अधिकारी राजू येडके, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, आत्माराम वागतकर,
एम. आर. राजुलवार , आनंत बिजले, श्री धुळे, श्री. टेंभुर्णे , बार्टीचे समतादूत अशोक
इंगोले, सुरेश पठाडे, प्रफुल पटेबहादूर, व्होदगीर मॅडम, पल्लवी गिते, श्री. फड, मीनाक्षी बांगर, खंदारे ताई, संगीता खादळे, श्री. नखाते,
श्री. वडकुते, दीपक कांबळे, संदीप घनतोडे, रितेश बगाटे,
सामाजिक न्याय विभाग, सर्व आर्थिक विकास महामंडळ, बार्टी व जात प्रमाणपत्र पडताळणीचे
सर्व कर्मचारी उपस्थिती होते .
याप्रसंगी जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई
गायकवाड यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक समता सप्ताह
निमित्ताने बार्टीच्या समतादूतांनी उत्तम प्रकारे विविध जण जागृती उपक्रम व प्रबोधन
कार्यक्रमा बदल गौरव उदगार व्यक्त केले.
****
No comments:
Post a Comment