माजी सैनिक नायब हवलदार, नायब सुबेदार, सुबेदार यांनी
अशासकीय लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 30
: हिंगोली,
वाशिम, नांदेड व परभणी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक नायब हवलदार, नायब सुबेदार, सुबेदार
यांच्याकडून जिल्हा सैनिक कक्ष हिंगोली येथे अशासकीय लिपिक टंकलेखक पद भरण्यासाठी अर्ज
मागविण्यात येत आहेत.
वरीलप्रमाणे
माजी सैनिकांनी भारतीय सैन्यात कमीत कमी 17 वर्षे लिपिक टंकलेखक पदावर सेवा केलेली
असावी. त्यांना लिपिक टंकलेखकाच्या कामाबद्दल माहिती असावी. तसेच त्यांना संगणकावर
काम करण्याबाबत माहिती असावी.
वरील
नमूद सर्व जिल्ह्यातील माजी सैनिक हवलदार, नायब सुबेदार, सुबेदार यांनी अशासकीय लिपिक
टंकलेखक पदासाठी वैयक्तीक अर्ज (मोबाईल नंबरसह), माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत,
रोजगार कार्ड आणि सेवा पुस्तक (डिस्चार्ज बूक) या कागदपत्रासह दि. 9 जून, 2022 रोजी
दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे जमा करावे.
अधिक
माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली (मो.क्र. 9404975099) यांच्याशी संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे .
******
No comments:
Post a Comment