स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत
प्रधान
मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत वितरणासाठी धान्य उपलब्ध
हिंगोली (जिमाका), दि. 26 : स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव या उपक्रमामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक
व्यत्ययामुळे गरिबांना सामोरे जावे लागत असलेल्या ठिकाणी प्रसंगाच्या
पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत लक्ष्यनिर्धारित
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाने एप्रिल, 2020 ते
सप्टेंबर, 2022 या कालावधीत 06 टप्प्यांमध्ये मोफत अन्नधान्य गहू व तांदूळ,
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रती
सदस्य प्रती महा 05 किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले
आहे.
माहे एप्रिल, 2020 ते एप्रिल, 2022 या कालावधीत
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक व्यत्ययामुळे गरिबांना सामोरे
जावे लागत असलेल्या ठिकाणी प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण
अन्न योजना अंतर्गत लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र
लाभार्थ्यांना अंदाजे 35 हजार 778 मेट्रिक टन गहू आणि 35 हजार 835 मेट्रिक टन
तांदूळ असे एकूण 71 हजार 614 मेट्रिक टन अन्नधान्य वाटप करण्यात आलेले आहे.
तसेच कोविडच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य
कुटुंबातील लाभार्थ्यांना लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जुलै ते
नोव्हेंबर, 2020 या कालावधीसाठी 879.767 क्विंटल मोफत चनादाळ वितरीत करण्यात आलेली
आहे.
प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत
माहे एप्रिल, 2022 ते सप्टेंबर, 2022 या कालावधीसाठी मासिक 3320 मेट्रिक टन गहू,
993 मेट्रिक टन तांदूळ मोफत वितरणासाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेला आहे.
अंत्योदय अन्न योजनेत प्रती सदस्य 02 किलो गहू,
03 किलो तांदूळ असे एकूण 05 किलो धान्य मोफत वितरीत करण्यात येणार आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत प्रती सदस्य
गहू 01 किलो व तांदूळ 04 किलो असे एकूण 05 किलो मोफत वितरीत करण्यात येणार आहे.
याची सर्व पात्र लाभार्थ्यांनी नोंद घेऊन त्या प्रमाणात संबंधित रास्तभाव
दुकानांमधून या सुधारित धान्याच्या परिमाणानुसार धान्य उपलब्ध करुन घेण्यात यावे. तालुका
पुरवठा कार्यालय व रास्त भाव दुकानदार यांनी याबाबत अधिकाधिक प्रसिध्दी द्यावी,असे
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment