19 May, 2022

 पारधी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 19 : पारधी विकास योजना सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत खालील दर्शविलेल्या प्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील पारधी जमातीच्या विविध योजना राबविण्यासाठी लाभार्थ्यांकडून , शासनमान्य संस्थेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी या कार्यालयात उपलब्ध आहेत.

इच्छूक लाभार्थ्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह दिनांक 25 मे 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत. विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

सन 2020-21 या वर्षासाठी पारधी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना व्यवसायासाठी संगणक, झेरॉक्स मशीन व स्टेशनरी योजना, पारधी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना हळद कुकर वाटप करणे योजना, पारधी समाजातील युवक, युवतींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणे, तसेच सन 2021-2022 या वर्षासाठी पारधी समाजातील महिला , पुरुष लाभार्थ्यांना शेळीगटाचे लाभ देणे, पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणे,  पारधी समाजातील लाभार्थ्यांना शेती करिता काटेरी तार कूपन आर्थिक सहाय्य करणे, पारधी समाजातील लाभार्थ्यांना दुधाळ जनावर मुऱ्हा म्हशीचे लाभ देणे, पारधी समाजातील लाभार्थ्यांना  पिठ गिरणीचे लाभ देणे या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

वरील तीन योजनापैकी एकाच योजनेसाठी अर्ज करावे. जर दोन्ही योजनेसाठी अर्ज केला  असल्यास कमी लाभाच्या योजनेचा अर्ज रद्द करण्यात येईल. योजना रद्द करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी यांनी राखून ठेवले आहेत, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

******** 

No comments: