20 May, 2022

निवृत्ती वेतन धारकांनी सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

निवृत्ती वेतन धारकांनी सातव्या वेतन आयोगानुसार

सुधारीत निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका) दि.20 : शासनाच्या प्रचलित ‍नियमाप्रमाणे निवृत्ती वेतन धारकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्तीवेतन प्रदान करण्याची कार्यवाही या कोषागारामार्फत  करण्यात येते. परंतू काही निवृत्तीवेतन धारकांना अद्यापही पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्ती वेतन प्रदान होत आहे. निवृत्ती वेतन धारकांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे प्रदान करण्यात येत नाही. त्यांनी त्यांच्या निवृत्ती वेतन मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यांकडे संपर्क साधून सुधारीत निवृत्ती वेतन  मंजूर  करुन  घेण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, यांनी केले आहे.

ज्या निवृत्ती वेतन धारकांना सन 2022-23 मध्ये आयकर  कपात होणार असेल त्यांनी आपल्या बचती  कोषागाराला  कळवावे. निवृत्ती वेतन धारकांना 80 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर  शासनाच्या नियमाप्रमाणे वाढीव निवृत्ती वेतन देण्यात येते. अशा प्रकरणामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या जन्म तारखा  उपलब्ध नसल्याने किंवा ज्या उपलब्ध आहेत त्यामध्ये  सुस्पष्टता नसल्याचे दिसून आले आहे. वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ देणे करीता जन्म तारखेचा पुरावा देण्यात यावे असे आवाहन कोषागार कार्यालय, हिंगोली यांच्याद्वारे करण्यात येत आहे.   0000

No comments: