11 May, 2022

 

प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी

लाभार्थी हिस्सा भरण्याचे आवाहन

                हिंगोली (जिमाका), दि. 11 : राज्यातील महाकृषी अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी ऑनलाईन, धनाकर्षाद्वारे लाभार्थी हिस्सा भरावयाचा असल्यास ई-पोर्टलवर धनाकर्षाची (डिमांड ड्राफ्ट) प्रत अपलोड करुन नजीकच्या महाऊर्जाच्या कार्यालयास भेटून जमा करावे.

                जिल्ह्यातील सौर कृषी पंपाचा सर्वसाधारण लाभार्थी कोटा संपल्यानंतर काही सर्वसाधारण गटातील शेतकरी अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीच्या घटकांमधून चुकीचे जातीचे प्रमाणपत्र ई-पोर्टलवर अपलोड करुन अर्ज सादर करीत आहेत. संबंधित अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या घटकामधील नसून सर्वसाधारण लाभार्थी म्हणून लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जाच्या संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये भेट देऊन अर्ज स्वीकारण्यासाठी तगादा लावत असल्याचे निदर्शनास आले आहे.

                सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांनी , अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या घटकांचा लाभार्थी म्हणून सौर कृषी पंपाची ई-पोर्टलवर चुकीचे जातीचे प्रमाणपत्र अपलोड करुन नोंद केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

                राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यास ई-पोर्टलवर अर्ज करण्यास, लाभार्थी हिस्सा भरण्यास व इतर अंमलबजावणी संदर्भात अडी-अडचणी असल्यास महाऊर्जाच्या मुख्यालय दूरध्वनी क्रमांक – 02035000456, 020-35000455 यावर तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यानी विभागीय कार्यालय, नागपूर येथील मो.नं. 9423113865, 0712-2531602 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वा. पर्यंत संपर्क साधावा. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी विभागीय कार्यालय, अमरावती येथील मो. नं. 7030927337, 0721-2661610 या क्रमांकावर संपर्क साधावा. लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी विभागीय कार्यालय, लातूर यांच्या मो. नं. 9511684703, 02382-226680 या क्रमांकावर संपर्क साधावा. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी विभागीय कार्यालय, औरंगाबाद यांच्या मो.नं. 7030927268, 0240-2653595 या क्रमांकावर संपर्क साधावा. नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी विभागीय कार्यालय, नाशिक यांच्या मो.नं. 7030927279, 0253-2598685 या क्रमांकावर संपर्क साधावा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी विभागीय कार्यालय, मुंबई येथील मो. नं. 9021219479, 022-22876436 या क्रमांकावर संपर्क साधावा. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी विभागीय कार्यालय, कोल्हापूर येथील मो.नं. 7030927301, 0231-2680009 या क्रमांकावर संपर्क साधावा. पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी विभागीय कार्यालय, पुणे येथील मो.नं. 7030927255, 020-35000454 या क्रमांकावर संपर्क साधावा.

                तसेच योजनेंतर्गत लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची सुधारित अंतिम मुदत दि. 31 मे, 2022 पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी दि. 31 मे, 2022 पर्यंत लाभार्थी हिस्सा जमा करावा.

                पीएम-कुसूम योजनेंतर्गत 50 हजार सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे सद्यस्थितीत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील उपरोक्त उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तसेच अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग, ठाणे व वर्धा या जिल्ह्यांमध्ये सौर कृषिपंप उपलब्ध असून लाभार्थ्यांनी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे महाऊर्जाचे महासंचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: