13 May, 2022

 

मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी

समर्पित आयोगाच्या विभागवार भेटी

 

हिंगोली (जिमाका) दि. 13 :- नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचे सदस्य 21 मे ते 28 मे 2022 या कालावधीत विभागवार भेटी देणार आहेत. यासाठी समर्पित आयोगाने विभागनिहाय कार्यक्रम जाहिर केला आहे. समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना स्वत:ची मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे आयोगातर्फे कळविण्यात आले आहे.   

            राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटीत केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्यासाठी समर्पित आयोगाने पुढीलप्रमाणे विभागवार कार्यक्रम जाहिर केला आहे.

            शनिवार 21 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे तर रविवार 22 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे तर रविवार सायं. 5.30 ते 7.30 या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे तर बुधवार 25 मे 2022 रोजी दुपारी 2.30 ते 4.30 या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे तर शनिवार 28 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत  विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे तर शनिवार 28 मे 2022 रोजी सायं. 4.30 ते 6.30 या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे समर्पित आयोगाचे सदस्य भेट देणार आहेत संबंधितानी यांची नोंद घ्यावी.  

*****

 

No comments: