1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित
प्रारुप मतदार यादीचे
27 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभेत वाचन करण्याचे
आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने
दि. 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्याचा विशेष
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला
आहे.
हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी, 94-हिंगोली विधानसभा
मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार
आहे. तसेच दि. 27 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्ह्यातील सर्व
ग्रामपंचायतीमध्ये व विशेष ग्रामसभा आयोजित करुन दि. 01 जानेवारी, 2024 या अर्हता
दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.
विशेष ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच सर्व
नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मा. भारत निवडणूक
आयोगाच्या निर्देशानुसार आता वर्षभरात चार वेळा (01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै,
01 ऑक्टोबर) या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. गावातील दिव्यांग
मतदारांचा शोध घेऊन मतदार यादीत फ्लॅगींग करणे, गावातील तृतीय पंथी मतदारांचा शोध
घेऊन त्यांची मतदार नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. नव्याने लग्न होऊन आलेल्या नव
विवाहित महिलांची मतदार नोंदणीसाठी नमुना-6 चे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच
मतदार यादीमध्ये मतदारांच्या तपशीलात काही त्रुटी असल्यास त्याच ठिकाणी विहित
नमुन्यातील नमुना 8 मध्ये अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच दि. 01 जानेवारी,
2024 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेल्या पात्र मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ
करुन विहित नमुना नं.6 मध्ये अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. मतदार यादीमधील मयत मतदारांचे
नमुना 7 मध्ये अर्ज भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा
करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी केले
आहे.
*******
No comments:
Post a Comment