11 October, 2023

 

दुर्गादेवी उत्सव व सार्जनिक दसरा महोत्सवानिमित्त

हिंगोली शहरातील वाहतूक मार्गात बदल

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : हिंगोली शहरात दि. 14 ऑक्टोबर ते दि. 25 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत दुर्गादेवी उत्सव व सार्वजनिक दसरा महोत्सवानिमित्त हिंगोली शहरात प्रदर्शनी, रामलीला, भरत भेट, दुर्गादेवी विसर्जन, विविध खेळ तसेच इतर कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामीण भागातून व इतर जिल्ह्यातून जास्त प्रमाणात लोक येतात. त्यामुळे हिंगोली शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. तसेच शहरात चेंगराचेंगरी व अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये दि. 14 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते दि. 25 ऑक्टोबर, 2023 रोजीचे 23.00 वाजेपर्यंत हिंगोली शहरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे.

नांदेड नाका ते महात्मा गांधी चौकाकडे जाणारी जड वाहने, खटकाळी बायपास येथून हिंगोली शहरात येणारी जड वाहने, अकोला बायपास, वाशिमकडून येणारे सर्व जड वाहने, जवळा पळशीकडून हिंगोली शहरात येणारे सर्व जड वाहने, इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक ॲटो तसेच चार चाकी वाहने, खुराणा पेट्रोलपंप ते महात्मा गांधी चौक तसेच इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक तसेच अंबिका टॉकीज ते महात्मा गांधी चौक रस्त्याने ॲटो तसेच चार चाकी वाहने वाहतूक व जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात करण्यात आले आहेत.

वाहतुकीसाठी औंढाकडून येणारे व वाशिमला जाणारी जड वाहने नांदेड नाका मार्गे बायपासने जातील. कळमनुरी ते वाशिम येणारे व जाणारे जड वाहने हायवेने येतील व जातील. वाशिम ते परभणी येणारी व जाणारी जड वाहने बायपास, नांदेड नाका मार्गे येतील व जातील. कळमनुरी ते औंढा नागनाथ येणारी व जाणारी जड वाहने नांदेड नाका मार्गे येतील व जातील. शहरातील चारचाकी वाहने संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे पार्कींग करतील, मुख्य बाजारपेठेत जाणार नाही. जवळा पळशी कडून येणारी व जाणारी चार चाकी व प्रवाशी वाहने अंबिका टॉकीज ते जुने नगर परिषद चौक या पर्यायी मार्गाचा वापर करतील.

दुर्गादेवी उत्सव व सार्वजनिक दसरा महोत्सवानिमित्त हिंगोली शहरात वाहतुकीस अडथळा होऊ नये तसेच कोणतेही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दि. 14 ऑक्टोबर ते दि. 25 ऑक्टोबर, 2023 पर्यंत पर्यायी मार्गाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

वाहन चालकांनी हिंगोली शहरातील महत्वाचे बाजारपेठ इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक, खुराणा पेट्रोलपंप ते महात्मा गांधी चौक, अंबिका टॉकीज ते महात्मा गांधी चौक येथे जावयाचे असल्यास त्यांनी संत नामदेव पोलीस मैदान गेट नं. 2 येथे आपले चार चाकी वाहन पार्कींग करुनच शहरात जावे. कोणतेही वाहन रोडवर नोपार्कींगमध्ये सोडू नये. जेणे करुन वाहतूक रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, हिंगोली यांनी केले आहे.

****** 

No comments: