'माझी
माती,माझा देश' अभियानांतर्गत
हिंगोली जिल्ह्यातील
अमृत कलश मुंबईकडे रवाना
हिंगोली
(जिमाका), दि. 26 : ‘मेरी माटी, मेरा देश-माझी माती, माझा देश’
अभियान अंतर्गत जिल्ह्यातून ग्रामपंचायत ते नगरपरिषद क्षेत्रातून एकत्र केलेले
मातीचे अमृत कलश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी
दाखवून मुंबईकडे रवाना करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय
दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प
संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
संतोष राऊत, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी
अनंत कुंभार, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, मुख्य
लेखा व वित्त अधिकारी माडे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी विष्णू भोजे, नेहरु
युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, जिल्हा समन्वयक सुनिल अंभूरे, नगर
परिषदेचे उप मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, 12 स्वयंसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील
ग्रामीण भागातून प्रत्येक पंचायत समितीमधून एक असे 05, जिल्ह्यातील 5 नगरपालिका व नगर
पंचायतकडून एक अमृत कलश असे एकूण 06 अमृत कलश घेऊन दि. 25 ऑक्टोबर, 2023 रोजी 12
स्वयंसेवक व एक जिल्हा समन्वयक अधिकारी असे 13 जण जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथून
रवाना झाले आहेत. हे अमृत कलश घेऊन गेलेले स्वयंसेवक व समन्वयक दि. 27 ऑक्टोबर
रोजी मुंबई येथे आयोजित राज्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर मुंबई
येथून 27 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष रेल्वेने दिल्लीकडे
रवाना होतील. दिल्ली येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 31 ऑक्टोबर रोजी भव्य कार्यक्रम होणार
आहे. देशभरातून दिल्ली येथे पोहचलेल्या अमृत कलशातून अमृत वाटिका
तयार केली जाणार आहे.
*****
No comments:
Post a Comment