13 October, 2023

 

आपत्ती प्रतिसादासाठी कटिबध्द होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली प्रतिज्ञा

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : आपत्ती निवारण दिवसानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती प्रतिसादासाठी कटिबध्द होण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आपत्ती प्रतिसादासाठी कटिबध्द होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने         दि. 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती निवारण दिवस म्हणून घोषित केला आहे. राज्य शासनानेही दि. 8 सप्टेंबर, 2017 च्या शासन परिपत्रकान्वये दरवर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये व राज्य पातळीवर दि. 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत.  

******

No comments: