18 October, 2023

 

जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीमधून आलेले अमृत कलश

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केले सुपूर्द




 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियानांतर्गत जिल्ह्यातील माती दिल्ली येथील अमृत वाटिका निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीमधून आलेले कलश सन्मापूर्वक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशात मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर त्यांचे गावातील माती कलाशात जमा करुन तालुकास्तरावर गटविकास अधिकारी स्तरावर आणण्यात आले व आज पाचही पंचायत समिती स्तरावरुन प्रत्येकी एक अमृत कलश समारंभपूर्वक जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिल्ली येथे होणाऱ्या अमृत वाटिकासाठी सन्मानपूर्वक देण्यात आले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, ए. एल. बोंद्रे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रत्येक पंचायत समितीमधून एक याप्रमाणे पाच पंचायत समितीतून आलेले पाच अमृत कलश मुंबई येथे रवाना होणार आहेत. या अमृत कलशातील माती दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेसाठी वापरण्यात येणार आहे.

 

हिंगोली पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय अमृत कलश यात्रेचे आयोजन

 

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश उपक्रमामध्ये दिनांक 01 सप्टेंबर 2023 ते  30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अमृत कलश यात्रा आयोजित करण्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सूचनेनुसार आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी हिंगोली पंचायत समितीच्या वतीने पं.स हिंगोली प्रांगणात   तालुकास्तरीय अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत 01 ते 13 ऑक्टोंबर या कालावधीत गावस्तरावरुन जनजागृती , मिट्टी गान, विविध वाद्य  वाजवून वातावरण तयार करुन घरोघरी माती गोळा करुन 111 ग्रामपंचायतीअंतर्गत अमृत कलश तालुकास्तरावर प्राप्त करुन घेण्यात आले. त्यानुसार प्रत्येक गावातील जमा केलेली अमृत कलश तालुकास्तरावर  उत्सवाच्या वातावरणात शहिदांचे स्मरण करुन तसेच महाविद्यालय व शालेय विद्यार्थी अंगणवाडी कर्मचारी, महिला यांच्या सक्रीय सहभागातून तालुकास्तरीय अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, सहायक गटविकास अधिकारी विष्णू भोजे, सहायक प्रशासन अधिकारी धनंजय पांडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी काद्री, लेखाधिकारी श्याम बांगर व इतर अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदविला.

******

No comments: