प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान कार्ड काढण्याचे
आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 15 : आयुष्यमान भारत योजनेसाठी नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढणे अत्यंत
आवश्यक आहे. कुटुंबास 5 लाखापर्यंतचा लाभ मिळतो. नागरिकांनी आपले आयुष्य मान योजनेचे कार्ड त्वरित
काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी आरोग्य विमा योजना आहे.
2020 पासून ही योजना संपूर्ण देशात यशस्वीपणे
राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना विमा योजना यशस्वीपणे
राबविण्यात येत आहे. महात्मा फुले जन आरोग्य
योजनेअंतर्गत प्रती कुटुंबास पाच लाखापर्यंत
लाभ देण्यात येतो. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय उपचाराची सोय उपलब्ध
केली जाते. मात्र यासाठी आयुष्मान कार्ड काढणे अत्यंत आवश्यक आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये 1 लाख 44 हजार 740 इतक्या लाभार्थ्यांनी गोल्डन
कार्ड काढले आहेत. या महत्वकांक्षी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्याने आरोग्य वैद्यकीय खर्चाची चिंता मिटली आहे. महात्मा
फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र सरकारची प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना एकत्र करुन आरोग्य संरक्षण दीड लाखावरुन 5 लाखापर्यंत
करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकांना पाच लाख रुपयांची आरोग्य
कवच मिळाले आहे. यासाठी गोल्डन कार्ड म्हणजे
आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे.
हिंगोली जिल्ह्यात संपूर्ण
आरोग्य संस्थांमध्ये, ग्रामपंचायत मध्ये, आयुष्यमान कार्ड काढले जात आहे. याचा संपूर्ण
जनतेनी लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले
आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सहभाग नोंदवून गोल्डन कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या
गावातील सरकारी दवाखाना,, ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र, सी एस सी या ठिकाणी
संपर्क साधू शकता. या ठिकाणी गोल्डन कार्ड मोफत काढून मिळेल. या शिवाय जवळचे जवळचे
उपकेंद्र या ठिकाणी देखील गोल्डन कार्ड काढता येऊ शकते. कार्डासाठी लाभार्थीचे आधार
कार्ड आवश्यक आहे. गोल्डन कार्ड मिळाल्यास
5 लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतो. यासाठी
विविध दवाखान्याचा समावेश कुटुंबातील सर्व व्यक्तीसाठी ही योजना लागू राहील. प्रधानमंत्री
आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यातील
1) जिल्हा रुग्णालय हिंगोली, 2) आयकॉन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हिंगोली, 3) लक्ष्मी
लाईफ केअर हॉस्पिटल हिंगोली, 4) नाकाडे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हिंगोली, 5) उपजिल्हा
रुग्णालय कळमनुरी, 6) शिवम हॉस्पिटल हिंगोली, 7) स्नेहल नर्सिंग होम हिंगोली, 8) शासकीय
स्त्री रुग्णालय वसमत, 9) माधव मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हिंगोली ही सलग्न रुग्णालये
आहेत.
*****
No comments:
Post a Comment