आकांक्षीत तालुका अंतर्गत आरोग्य मेळावे संपन्न
हिंगोली (जिमाका), दि.
03 : जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. कैलास शेळके, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.
नामदेव कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, सहायक गटविकास अधिकारी विष्णू
भोजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जनसमुदाय
आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांनी आज दिनांक 3
ऑक्टोबर रोजी हिंगोली तालुक्यात आकांक्षीत
तालुका अंतर्गत आरोग्य मेळावे घेण्यात आले.
आयुष्यमान भव मोहिम: अंतर्गत आकांक्षीत जिल्ह्यामध्ये संकल्प सप्ताह
03 ऑक्टोबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज दिनांक 3 ऑक्टोबर
रोजी हिंगोली तालुक्यातील सिरसम, फाळेगाव, भांडेगाव, नरसी नामदेव या चार प्राथमिक आरोग्य
केंद्र व अंतर्गत 23 उपकेंद्रांमध्ये तसेच हिंगोली शहरातील दोन नागरी आरोग्य केंद्र
व तीन नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आपला दवाखाना असे एकूण 31 ठिकाणी आरोग्य मेळावे घेण्यात
आले . या मेळाव्यामध्ये प्रसूतीपूर्व आरोग्य
गरोदर मातांची तपासणी व त्यांचे लसीकरण, बालकांचे लसीकरण, मातांची ॲनिमिया करता
तपासणी व त्यांना उपचार करण्यात आले. संसर्गजन्य आजारामध्ये मधुमेह रक्तदाब संशयित
कर्करोग यांची तपासणी करण्यात आली. संशयित क्षयरुग्णाची तपासणी करुन त्यांचे थुंकी
नमुने घेण्यात आले. आरोग्य शिक्षण व त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरांचा
लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment