03 October, 2023

 

पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : सध्या सिध्देश्वर व येलदरी धरणाच्या उर्ध्व भागात पर्जन्यमान सुरु असल्याने पाण्याचा येवा होत आहे. सध्या येलदरी प्रकल्प 62.28 टक्के व सिध्देश्वर प्रकल्प 98.81 टक्के भरला आहे.

धरणातील पाण्याचा येवा पाहता धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णा प्रकल्पाच्या सिध्देश्वर धरणातून वक्रद्वाराद्वारे कोणत्याही  क्षणी पाणी  पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदी काठच्या परिसरातील गावांच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, जनावरे सोडू नये किंवा कोणतीही जिवित वा वित्तहानी होणार नाही याची  पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी  खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

*******

No comments: