अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
हिंगोली, (जिमाका)
दि. 16 : कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत परभणी व हिंगोली या जिल्ह्याचा
समावेश असून सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना
महाविद्यालयात प्रवेशित व पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवरुन
त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यात येते. विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 11 ऑक्टोबर
पासून https://mahadbtmahiti.gov.in या
संकेतस्थळावर ऑनलाईन प्रकिया सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला त्या
महाविद्यालयाचे बोनाफाईड, जातीचे प्रमाणपत्र, पालकाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
रहिवाशी प्रमाणपत्र , उत्तीर्ण झालेली टीसी, गुणपत्रिका व इतर सर्व मूळ कागदपत्रे
स्कॅन करुन महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावेत. ऑनलाईन अर्ज भरुन अर्जाची प्रत व
अपलोड केलेले मूळ कागदपत्रे संबंधित महाविद्यालयाकडे जमा करावेत. तसेच संबंधित
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज व सर्व मूळ कागदपत्राची तपासणी करुन
पात्र असलेला अर्ज प्रकल्प कार्यालयाच्या स्तरावर मंजुरीसाठी ऑनलाईन पाठवावेत.
याबाबत विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment