03 October, 2023

 

माजी सैनिक व माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : मराठवाडा पर्यावरण बटालियन, 136 इन्फंट्री बटालियन टी.ए.इको, महार (एमओईएफ) आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या माजी सैनिक आणि माजी महिला कर्मऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महार (एमओईएफ) मध्ये भरतीसाठी दि. 17 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री येथे भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये सोल्जर जीडी-87 पदे, क्लार्क-06 पदे, चिफ कम्युनिटी-01, हाऊस कीपर-01, ब्लॅकस्मिथ-01, मेस कीपर-01, आर्टीसन (Artisan WW)-01 अशा एकूण 98 पदासाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  

या भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवा करणारे सर्व पात्र उमेदवार दिलेल्या वेळापत्रकानुसार दि. 17 ऑक्टोबर, 2023 रोजी कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री येथे दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी 6.00 वाजता फिटनेस चाचणीसह सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेच्या एक तास अगोदर म्हणजे पहाटे 5.00 वाजता पोहोचणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*******

No comments: