जलजीवन मिशन अंतर्गत प्रशिक्षण संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 15 : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद हिंगोली व स्टुडन्ट रिलीफ
सोसायटी राजस्थानच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात 52
ग्रामपंचायतीमध्ये 3096 ग्रामपंचायत सदस्याचे गटस्तरीय प्रशिक्षण
आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणात 563 ग्रामपंचायत
मधील सरपंच, उपसरपंच , ग्राम आरोग्य व पाणीपुरवठा समितीतील सदस्य, आशा वर्कर,
अंगणवाडी ताई , सेविका, पंप ऑपरेटर, जलसंरक्षक, ग्रामसेवक यांना प्रशिक्षण देण्यात
आले.
ज्यामध्ये
जलजीवन मिशनचा उद्देश, लोकसहभाग उद्दिष्ट, नियोजन, अंमलबजावणी योजना दुरुस्ती,
पाणीपुरवठा व स्वच्छता, पाणी तपासणी, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपट्टी आकारणी
रेकॉर्ड, स्त्रोत मजबुतीकरण अशा सर्व विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणाचे आयोजक दीपक दुबे, नितेश कुमार, राजेंद्र सरकटे
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष सल्लागार हे होते. हे प्रशिक्षण दिनांक 12
ऑक्टोंबर 2023 रोजीं पंचायत समिती वसमत येथे समारोप प्रसंगी उप
मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आत्माराम बोंद्रे व गटविकास अधिकारी यू.
डी. तोटावार यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या संपन्न
झाला आहे .
*****
No comments:
Post a Comment