13 October, 2023

 

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेल्या समितीचा 17 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्याचा दौरा

नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज 2 ते 4 या वेळेत उपलब्ध करुन देण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 :  मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची  कार्यपध्दती  विहीत करण्यासाठी  गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे 17 ऑक्टोबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्या दरम्यान हिंगोली येथे समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने  समितीची  बैठक मंगळवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी  कार्यालयात  घेणार आहेत. जिल्हाधिकारी  कार्यालय येथे दुपारी 2 ते 4 या वेळेत नागरिकांकडून पुरावे स्वीकारले जाणार आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत. पुरावा शक्यतो साक्षांकित असावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

*****

No comments: