04 October, 2023

 

दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

 

 हिंगोली (जिमाका), दि. 04 : दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष मंत्री दर्जा ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे हिंगोली जिल्हा अभियान कार्यक्रमासाठी दि. 5 ऑक्टोबर, 2023 रोजी  हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 5 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता हनुमान नगर हिंगोली येथील डॉ. प्रशांत घुगे यांच्या निवासस्थानी भेट. सकाळी 10.00 ते सांय. 4.00 वाजता मधुरदिप पॅलेस अकोला बायपास रोड हिंगोली येथे दिव्यांग कार्यक्रमास उपस्थिती . सांय. 4.00 वाजता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग संबंधित राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण अधिकारी यांची आढावा बैठकीस उपस्थिती राहणार आहेत.

*****

No comments: