चिंचोली येथील वनराई बंधाऱ्यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ
बासंबा येथेही वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ
हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल,
कृषी, जलसंधारण व वनविभागातर्फे यावर्षी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला एक हजार
याप्रमाणे 5 हजार वनराई बंधारे तयार करावयाचे आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने
वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून प्रवाहीत नाल्यामध्ये लोकसहभागातून विकेंद्रीत
जलसाठे निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आज हिंगोली तालुक्यातील चिंचोली येथील वनराई
बंधाऱ्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते व बासंबा येथील
वनराई बंधाऱ्यांचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांच्या हस्ते श्रीफळ
फोडून करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
संजय दैने, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे,
तहसीलदार नवनाथ वगवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा
परिषदेच्या सहायक जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, चिंचोलीचे सरपंच सुरेश
राठोड, नांदुसाचे सरपंच विश्वनाथ कपाटे,
बासंबाचे सरंपच बाजीराव घुगे, मंडळ अधिकारी किर्ती मसारे, एन. डी. नाईक, तलाठी
अनिल काळे, पठाण उपस्थित होते.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी,
नागरिकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment