अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करण्यासाठी
बृहत आराखडा प्रसिध्द
- 20 ऑक्टोबर पर्यंत
सूचना व हरकती दाखल करण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 16 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत दर पाच वर्षानी
बृहत आराखडा घोषित करण्यात येतो. त्या अनुषंगाने सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षाच्या
कालावधीचा हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत गावनिहाय घोषित केलेल्या अनुसूचित
जातीच्या वस्त्यांचा एकत्रित बृहत आराखडा तयार करुन गटविकास अधिकारी यांच्यामार्फत
जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रित
बृहत आराखडा तयार करण्यात आलेला असून पंचायत समितीसाठी पाठविण्यात आलेला आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या
वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षाच्या कालावधीचा
बृहत आराखडा त्या त्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये तसेच समाज कल्याण विभाग, जिल्हा
परिषद, हिंगोली यांच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेला आहे. तसेच हिंगोली जिल्ह्याच्या
hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या बृहत आराखड्यावर काही सूचना व
हरकती असल्यास त्यांनी संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे दि.
20 ऑक्टोबर, 2023 पर्यंत दाखल करावेत. तद्नंतर आलेल्या सूचना व हरकती विचारात घेतल्या
जाणार नाहीत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा समाज कल्याण
अधिकारी आर. एच. येडके यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment