हृदय शस्त्रक्रियेसाठी संदर्भीत 14 बालकांना घेऊन
जाणाऱ्या बसला
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी हिरवा झेंडा
दाखवून केली रवाना
हिंगोली (जिमाका), दि. 20 : राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत व केंद्र शासनाचा
अतिशय महत्वपूर्ण आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य
कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून 7 ते 18 वर्ष वयोगटातील संदर्भीत संशयित हृदय
रुग्णासाठी दि. 13 ऑक्टोबर, 2023 रोजी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे टू-डी इको
तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या बालकाची तपासणी आचार्य विनोबा भावे
ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा येथील तज्ञ कार्डियालॉजीस्ट डॉ. शंतनु
गोमासे यांच्यामार्फत करण्यात आली. या 2-डी-इको तपासणीमधून 30 बालकांना पुढील हृदय
शस्त्रक्रिया करण्यासाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाकडून
आज दि. 20 ऑक्टोबर, 2023 रोजी हृदय शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण
रुग्णालय सावगी (मेघे) वर्धा येथे 14 बालकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णालयाच्या बसला जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आहे.
यावेळी अतिरिक्त
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपक मोरे, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, बालरोग तज्ञ डॉ.स्नेहल
नगरे, फिजीशियन डॉ.भालेराव, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. किरण कुऱ्हाडे,
वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, दंतरोग
सर्जन डॉ. फैसल खान, ज्ञानेश्वर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण
करण्यात आली.
हे कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक लक्ष्मण गाभणे, डॉ. शिवाजी विसलकर,
डॉ. नितीन बोरकर, डॉ. शिवाजी पंतगे, डॉ. कैलास पवार, डॉ. अमोल दरगु, डॉ. कुहिरे,
डॉ. पेरके, डॉ. डुकरे, डॉ हिंगोले, डॉ. टाक, डॉ. संतोष नांदूरकर (डिईआयसी मॅनेजर),
ज्ञानोबा चव्हाण व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील व डिईआयसी कार्यक्रमातील
वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, ए. एन. एम. व कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन
अधिपरिचारिका इत्यादींनी परिश्रम घेतले. या शस्त्रक्रियेसाठी संदर्भीत विद्यार्थ्यांच्या
शस्त्रक्रिया या महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेंतर्गत व आरबीएसके
कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहेत.
तसेच हिंगोली
जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना या आरबीएसके कार्यक्रमामार्फत अहवान करण्यात
येते. की दैनदिन जीवनात वावरतांना हृदयाच्या आजारासंदर्भात वेळोवेळी 2D- Echo
तपासणी करावी व वेळेत आजाराचे निदान करुन घ्यावे, असे आवाहन डॉ. नितीन तडस, जिल्हा
शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment