‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत नरसी येथे महा श्रमदान
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांचा सहभाग
हिंगोली (जिमाका), दि. 01 : हिंगोली तालुक्यातील नरसी येथील संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर परिसरात व कयाधु नदी घाटावर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा
अभियान अंतर्गत "एक तारीख एक तास महाश्रमदान" कार्यक्रम राबविण्यात आला.
या महा श्रमदान
कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यांमध्ये नरसी नामदेव पर्यटन स्थळ, मंदिर परिसर , मंदिराचा
मुख्य रस्ता, मुख्यद्वार व मंदिर परिसर, कयाधू नदी घाटावर मोठ्या प्रमाणात महाश्रमदान
करण्यात आले. महा श्रमदान कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे विभाग प्रमुख,
पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचारी अधिकारी व तसेच नरसी ग्रामपंचायत मधील कर्मचारी,
विद्यार्थी, स्वयंसेवक महिला, बचत गटातील प्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक, सेवक व गावातील महिला, गावातील ज्येष्ठ नागरिक व
ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमात
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयजी दैने व त्यांच्या पत्नी अनघा संजय दैने एक घंटा स्वच्छतेसाठी श्रमदान
केले. मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत येथील सर्व गावात जिल्हा, तालूका, ग्राम
स्तरावरील सर्व ग्रामपंचायतीमध्ये महाश्रमदान राबविण्यात आले आहे. यामध्ये नरसी गावातील आलेल्या स्वयंसेवकाचां संजय दैने व अनघा संजय दैने
यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व विभागात विभाग प्रमुख यांनी सुद्धा स्वयंसेवकाचे
पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानांतर्गत दिनांक 15 सप्टेंबर
ते 02 ऑक्टोबर या कालावधीत "स्वच्छता ही सेवा" या वर्षाची थीम
‘‘कचरा मुक्त भारत’’ ही आहे. त्याचाच एक भाग म्हणून "एक तारीख
एक तास महाश्रमदान
" जिल्ह्यामध्ये यशस्वी राबविण्यात आले. तसेच नरसी येथे सर्व विभागातील विभाग प्रमुख, प्रकल्प संचालक
नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आत्माराम बोंद्रे, कार्यकारी
अभियंता पाणीपुरवठा विभाग वाटेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके, शिक्षणाधिकारी
संदीप सोनटक्के, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, जिल्हा पाणी व स्वच्छता
मिशन कक्षातील तज्ञ, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा
अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील
तसेच स्वच्छता उपक्रमाचा
दृश्यमान परिणाम दिसण्याच्या दृष्टीने महा श्रमदान राबविण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment