13 October, 2023

 

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-2023 स्पर्धेचा निकाल  घोषित

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते

हिंगोली येथील श्री सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाला जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण

 



 

            हिंगोली (जिमाका), दि. 13 :  राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा -2023 चा निकाल घोषित  करण्यात आला आहे. यामध्ये हिंगोली येथील श्री सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाला जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवार,  दिनांक 12 ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर,                  श्री सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष कल्याण देशमुख, पदाधिकारी गोविंद बियाणी, बाल समिती प्रमुख पार्थ कोरडे, शिवम पारवे, सुधीर बत्तलवाडीकर यांची उपस्थिती होती. यावेळी भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला "गणराज रंगी नाचतो" हा सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला आहे.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा -2023 मध्ये राज्यस्तरीय  प्रथम पुरस्कार श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पातूर, जिल्हा अकोला यांना , द्वितीय पुरस्कार  तिरंगा गणेशोत्सव मंडळ,यशवंतराव, विटा, ता. खानापूर, जि.  सांगली यांना तर  आणि तृतीय पुरस्कार मार्केट यार्ड मित्र मंडळ, मंचर,ता.  आंबेगाव, जि.  पुणे यांना जाहीर झाला आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये 5 लाख, व्दितीय क्रमांकास रुपये 2 लाख 50 हजार  आणि तृतीय क्रमांकास रुपये 01 लाख इतक्या रकमेचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व  प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.  याशिवाय  36 जिल्ह्यांतील जिल्हानिहाय पारितोषिक विजेत्यांनाही प्रत्येकी रुपये 25 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

***** 

No comments: