जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी परिक्षेचे वेळापत्रक
सर्व संबंधित
उमेदवारांनी नोंद घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 10 : येथील जिल्हा
परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात
क्र. 01/2023, दि. 5 ऑगस्ट, 2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. या
जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पदाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन
परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
कनिष्ठ लेख अधिकारी या पदाची ऑनलाईन परीक्षा दि.
15 ऑक्टोबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 1 मध्ये शासकीय तंत्रनिकेतन, लिंबाळा, हिंगोली
येथे होणार असून रिपोर्टींग टाईम सकाळी 7.00 वाजता आहे. पशुधन पर्यवेक्षक या पदाची
ऑनलाईन परीक्षा दि. 17 ऑक्टोबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 3 मध्ये 1) सिपना कॉलेज ऑफ
इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलाजी, नेमानी गोडाऊन समोर, बडनेरा रोड, अमरावती 2) माधव
इन्फोटेक अमरावती, लाईन नं. 3, राजतिलक रेडिमेड शॉपच्या जवळ, ड्रीमलँड मार्केट,
राष्ट्रीय महामार्ग क्र. 6, नागपूर रोड, अमरावती, 3) अर्न असोसिएट अमरावती,
ड्रीमलँड रेडिमेड मार्केट, लेन न. बी-5, नागपूर हायवे, अमरावती, 4) गिरीराज
एंटरप्रायजेस अमरावती, तिसरा मजला, बी-3 विंग, ड्रिमलँड बिझनेस पार्क, पंजाब नॅशनल
बँकेच्या वर, नागपूर रोड, अमरावती या केंद्रावर होणार आहे. या परिक्षेचे
रिपोर्टींग टाईम दुपारी 1.00 वाजता आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचे पदभरती जाहिरातीमध्ये
नमूद नसलेले परंतु दिनांक 15 ऑक्टोबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये परीक्षा
केंद्रावर घेण्यात येणाऱ्या परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) या पदाची ऑनलाईन
परीक्षा दि. 15 ऑक्टोबर, 2023 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, एमआयडीसी, लिंबाळा,
हिंगोली येथे शिफ्ट क्र. 2 मध्ये होणार असून त्याचा रिपोर्टींग टाईम सकाळी 11.00
वाजता आहे. कनिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रीकल) या पदाची ऑनलाईन परीक्षा दि. 15 ऑक्टोबर,
2023 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, एमआयडीसी, लिंबाळा, हिंगोली येथे शिफ्ट क्र. 3
मध्ये होणार असून त्याचा रिपोर्टींग टाईम दुपारी 3.00 वाजता आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचे पदभरती जाहिरातीमध्ये
नमूद नसलेले परंतु दिनांक 17 ऑक्टोबर, 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या परिक्षेकरिता
हिंगोली परीक्षा केंद्र निवड केलेल्या उमेदवारांना इतर जिल्ह्यामध्ये परीक्षा
केंद्र देण्यात आलेल्या परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
वायरमन व फिटर या पदाची ऑनलाईन परीक्षा दि. 17
ऑक्टोबर, 2023 रोजी ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णुपुरी गेट क्र. 18 व 22, नांदेड येथे होणार असून
वायरमन पदाची परीक्षा शिफ्ट क्र. 1 मध्ये होणार असून रिपोर्टींग टाईम सकाळी 7.00
वाजता आहे. तर फिटर या पदाची परीक्षा शिफ्ट क्र. 2 मध्ये होणार असून रिपोर्टींग
टाईम सकाळी 10.00 वाजता आहे.
वरील सर्व पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज
केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषद
हिंगोलीच्या www.zphingoli.in व
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.hingoli.nic.in
या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उमेदवारांना या लिंकद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड
करुन घेता येतील. तसेच उमेदवारांच्या माहितीसाठी मराठी व इंग्रजी भाषेतील माहिती
पुस्तिका www.zphingoli.in व www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर
प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र
डाऊनलोड करुन घ्यावेत. तसेच ऑनलाईन परिक्षेकरिता उमेदवारांनी त्यांच्या
परिक्षेच्या रिपोर्टींग वेळेच्या अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये
दिलेल्या सूचनांचे सक्त पालन करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी कोणतेही
इलेक्ट्रॉनिक्स अथवा डिजिटल उपकरणे सोबत आणण्यास सक्त मनाई आहे. या परिक्षेदरम्यान
उमेदवारांने कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार केल्यास त्यांना त्याच क्षणी जिल्हा
परिषदेच्या सर्व परीक्षांसाठी अपात्र ठरवून त्यांचे विरुध्द पोलीस गुन्हा नोंद
करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. जाहिरातीतील नमूद केलेल्या उर्वरित इतर
पदाच्या ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल.
उपरोक्त सर्व नमूद बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी
नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र
पापळकर व जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले
आहे.
No comments:
Post a Comment