23 March, 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती
हिंगोली (जिमाका), दि. 23 : हिंगोली लोकसभा मतदार संघातील 82-उमरखेड (यवतमाळ), 83-किनवट (नांदेड), 84-हदगाव (नांदेड) तसेच 92-वसमत, 93-कळमनुरी, 94-हिंगोली अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कामासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे.
हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन विशेष दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
त्यापैकी तीन सहायक निवडणूक अधिकारी हे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पदी कार्यरत असल्याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदसिध्द आहेत. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कामासाठी सहा विधानसभा मतदार संघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्त केलेले स्थायी निगराणी पथक (Static Surveillance Team) आणि फिरते पथक (Flying Squad) यांच्या प्रमुखांना विधानसभा कार्यक्षेत्र हद्दीपावेतो दि. 16 मार्च, 2024 पासून ते दि. 6 जून, 2024 पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशा प्रकारे नियुक्त केलेल्या कार्यकारी दंडाधिकारी यांना उक्त संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील शक्ती प्रदान करण्यात आले असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment