01 March, 2024
हिंगोली जिल्ह्यासाठी 635 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर
हिंगोली (जिमाका), दि. 01 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हयातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर-2023 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्याचे जिल्ह्यासाठी 635 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. हिंगोली-195.61 क्विंटल, औंढा ना.- 23 क्विंटल, सेनगाव- 121.79 क्विंटल, कळमनुरी- 142.84 क्विंटल, वसमत-151.76 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 635 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment