11 March, 2024

शासकीय वसतिगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण

हिंगोली (जिमाका), दि. 11 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त हिंगोली येथील नवीन मागासवर्गीय मुलींचे आणि मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह या दोन्ही वसतिगृह इमारतींचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतेच दूरदृष्यप्रणालीव्दारे करण्यात आले. पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री. विप्लव बाजोरिया, तानाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू ऊर्फ चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके आदि उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते इमारतीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अधीक्षक आत्माराव वागतकर, गृहपाल एस. डी. घुगे, एस. व्ही. ढोणे व इतर कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: