27 March, 2024
हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारत निवडणूक आयोगाने हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन निवडणूक खर्च निरीक्षकांची (Expenditure Observer) नियुक्ती केली आहे.
श्री. अन्वर अली हे 2005 च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असून, 7666878375 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. तामिळनाडू केडरचे अधिकारी असलेले श्री. अन्वर अली हे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत. तर कमलदीप सिंह हे 2015 च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असून, 9855306967 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. श्री.कमलदीप सिंह हे उमरखेड, किनवट आणि हदगाव या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निरीक्षणासाठी आलेले निवडणूक निरीक्षक अन्वर अली आणि कमलदीप सिंह यांना कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment