20 March, 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 खाजगी व्यक्तींच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध.
हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 16 मार्च, 2024 पासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधीनी, हितचिंतकानी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे इत्यादीसाठी कोणत्याही व्यक्तीची जागा, ईमारत, आवार, भिंत्ती आदीवर संबंधित मालकाची व संबंधित परवाना प्राधिकरणाची परवानगी शिवाय वापर करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 6 जून, 2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment