15 March, 2024

समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था विविध पुरस्काराने सन्मानित

हिंगोली (जिमाका), दि. 15 : समाज कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21 व 2021-22, 2022-23 यावर्षीच्या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई येथे करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील चार व्यक्ती व पाच संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये सन 2019-20 चा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार बाबूराव रामजी गाडे (माजी सैनिक) यांना, सन 2021-22 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार सोपान तुकाराम रणबावळे व देविदास खंडूजी खरात यांना, सन 2022-23 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार रमेश विठ्ठलराव खिल्लारे या समाज सेवकांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सन 2020-21 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व सन 2022-23 चा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार संजय सखाराम जामठीकर, अध्यक्ष, भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जामठी बु. ता. सेनगाव जि. हिंगोली यांना मिळाला आहे, सन 2021-22 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार श्रीमती वर्षा अखिलेश कुरील, अध्यक्ष सुवर्णा फाऊंडेशन, साई डेंटल क्लिनिक ॲन्ड इंप्लांट सेंटर, औढा नागनाथ जि.हिंगोली यांना, सन 2022-23 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार रामराव बाबाराव नागरे, अध्यक्ष, अंबेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, बेरुळा ता. औंढा नागनाथ जि.हिंगोली यांना व सन 2021-22 चा शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक श्रीमती सुनंदा नामदेवराव कल्याणकर, अध्यक्ष, नागनाथ ग्रामीण विकास महिला मंडळाला देऊन सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी दिली आहे. ******

No comments: