05 March, 2024
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधन आणि समाज सेवकांना तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी वैशाख शुध्द (अक्षय तृतीया) या दिवशी एक व्यक्ती व एका संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक , आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक , समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी दि. 21 मार्च, 2024 पर्यंत विहित नमुन्यातील प्रस्ताव तीन प्रतीत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment