01 March, 2024
प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 01 : भारताला सौर ऊर्जेमध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार देशातील एक कोटी घरांना सौर ऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करुन वीज शून्य करण्याचे लक्ष साधण्याचा शासनाचा मानस आहे.
या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी डाक विभागाला देण्यात आली आहे. याअनुषंगाने परभणी डाक विभागामार्फत असणाऱ्या परभणी व हिंगोली जिल्ह्यातील 388 डाक घरामार्फत व सातशे कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या योजनेच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी गावागावात पोस्ट खात्याचे सर्व कर्मचारी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी नजीकच्या डाक घर (पोस्ट कार्यालयाशी) व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment