14 March, 2024
हिंगोली जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहीर
हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सन 2024 या वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 25 एप्रिल, 2024 रोजी हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अल ऊर्फ चिरागशहा दर्गा उर्स हिंगोली, बुधवार, दि. 11 सप्टेंबर, 2024 रोजी जेष्ठ गौरी पूजन (महालक्ष्मी), गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुदर्शीनिमित्त स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
वरील तिन्ही स्थानिक सुट्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेतंर्गत कार्यालये, नगर परिषद कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागार महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना लागू राहतील.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment