28 March, 2024
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु
हिंगोली (जिमाका), दि. 28 : सन 2023-2024 या आर्थिक वर्षातील महसूल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच मार्च अखेर असल्यामुळे नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव नवीन वाहन नोंदणी व त्या अनुषंगाने कर वसुली करुन शासकीय महसूल जमा व्हावा, यासाठी परिवहन आयुक्त, मुंबई यांनी परिपत्रक जारी केले आहे.
त्या अनुषंगाने हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दि. 29 ते 31 मार्च, 2024 या तिन्ही सार्वजनिक सुटीच्या दिवशी नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषंगाने कर वसुलीचे कामकाज तसेच इतर परिवहन विषयक थकीत कर वसुली व खटला विभाग (महसूल जमा होणारे कामकाज) सुरु ठेवण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील नागरिक, वाहन वितरकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment