15 March, 2024
सर्व केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवासाठी आज फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्स कार्यशाळा
हिंगोली (जिमाका), दि. 15 : ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल, औषधी विभाग, अन्न व औषध प्रशासन व जिल्हा केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटना हिंगोली यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील सर्व केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट बांधवासाठी उद्या, शनिवार, दि. 16 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 वाजता कन्हैया हॉटेल, वसमत येथे रिफ्रेशर कोर्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत अन्न व औषध प्रशासन हिंगोलीमार्फत सर्व केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट बांधवांना जिल्हास्तरीय नार्को को ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशाचे तसेच पालन करावयाच्या नियमांचे व ग्राहक हक्काबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment