इच्छूक संस्थांनी कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रम चालविण्यासाठी
30 एप्रिल पर्यंत प्रस्ताव सादर करावेत
हिंगोली
(जिमाका), दि.25 : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ
मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष
2023-2024 करिता मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करुण्यासाठी इच्छूक पंजीकृत संस्थाकडून/व्यवस्थापनाकडून
तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थांकडून अर्ज मागविण्याबाबतची जाहिरात मंडळाच्या
www.msbsde.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
आलेली आहे.
प्रवेश सत्र 2023-24 पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थांना व अस्तित्वात
असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम/तुकडीवाढ सुरु करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छूक
संस्थांनी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. तसेच संबंधित
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडे प्रस्तावाच्या
4 नस्ती दि. 30 एप्रिल, 2023 पूर्वी सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार
करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,
हिंगोली यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment