शेतातील माती, पाणी,
रासायनिक/सेंद्रीय खते व वनस्पती यांची
तपासणी करुन घेण्याचे
शेतकऱ्यांना आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 11 : वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत माती, पाणी, रासायनिक, सेंद्रीय खते,
ऊती व पाने इत्यादीचे नमुने तपासणी येत आहे. तपासणीचे प्रकार व त्याचे प्रस्तावित दर
खालीलप्रमाणे आहेत.
माती तपासणी (Soil Analysis)
(pH, EC, OC, CaCO₃ , N. P. and
K) प्रती सँपल तपासणीसाठी 300 रुपये प्रस्तावित दर आहे. माती तपासणी (सुक्ष्म
अन्नद्रव्य) (pH, EC, OC, CaCO₃, N. P. K. and
Micronutrients Cu, Fe, Mn, Zn) या तपासणीसाठी प्रती सँपल 800 रुपये प्रस्तावित दर
आहे.
माती तपासणी
(pH, EC, CO₃, HCO₃, Ca, Mg, CI,
SAR, RSC) साठी प्रती सँपल 300 रुपये
प्रस्तावित दर आहे.
वरील घटकांव्यतिरिक्त
मातीचे मापदंड (Soil parameters other than above) तपासणीचे दर प्रती सँपल 100
रुपये आहे. प्रत्येक पॅरामीटरसाठी वनस्पती परीक्षण (Plant analysis for each
parameter)/ उत्ती/ पर्ण परीक्षण या तपासणी साठी प्रती पॅरामीटर प्रती सँपल 150
रुपये आहे.
प्रत्येक
पॅरामीटरसाठी शेणखत आणि कंपोस्ट परीक्षण (FYM and Compost analysis for each
parameter)/ सर्व प्रकारचे सेंद्रीय खत परीक्षण या तपासणीसाठी प्रती पॅरामीटर
प्रती सँपल 150 रुपये आहे. वनस्पती, शेणखत, कंपोस्ट खत परीक्षण (Plant, FYM,
Compost and Fertilizer analysis) यासाठी प्रती पॅरामीटर प्रती सँपल 250 रुपये
आहे.
माती परीक्षण
(Soil analysis) ( pH, EC, OC, CaCO₃, N. P and K)
या तपासणीसाठी प्रती सँपल 800 रुपये प्रस्तावित दर आहे. माती परीक्षण (Soil
analysis) ( pH, EC, OC, CaCO₃, N. P.K and
Micronutrients Cu, Fe, Mn, Zn ) या तपासणीसाठी प्रती सँपल 1200 रुपये प्रस्तावित
दर आहे.
पाणी तपासणी
साठी (Water analysis) (pH, EC, CO₃ , HCO₃, Ca Mg. Cl, SAR, RSC) प्रती सँपल 400 रुपये
प्रस्तावित दर आहे.
माती, वनस्पती
आणि सांडपाण्याच्या पाण्यापासून जड धातूचे परीक्षण (Analysis of heavy metals from
soil, plant and sewage water) या तपासणी साठी प्रती पॅरामीटर प्रती सँपल 400
रुपये आहे.
प्रयोगशाळेच्या प्रस्तावासाठी (Lab
proposal) प्रस्तावित दर 20 हजार रुपये आहे, तर माती, पाणी आणि वनस्पती विश्लेषण (Soil,
water and plant analysis training) (for 10 trainees for 5 days) with lodging
excluding meal) प्रशिक्षणासाठी 75 हजार रुपये प्रस्तावित दर आहे.
सर्व शेतकरी
बांधवांनी आपल्या शेतातील माती, पाणी, रासायनिक/सेंद्रीय खते व वनस्पती यांची
तपासणी करुन घ्यावी. तसेच त्यातील उपलब्ध अन्नद्रव्यानुसार शेतात खत व फवारणीचे
नियोजन करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
No comments:
Post a Comment