24 April, 2023

 


जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप

                                                                                                             

            हिंगोली (जिमाका), दि.24 : सामाजिक न्याय व विषय सहाय्य विभागाच्या वतीने दिनांक 1 एप्रिल ते 1 मे पर्यंत सामाजिक न्याय समता पर्व साजरा करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून  दि. 24 एप्रिल, 2023 रोजी           डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे मागासगर्वीय विद्यार्थ्यांना जातीचे वैधता प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.

            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवने, उगम ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, जिल्हा महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या छायाताई पडघन , ऊसतोड कामगार प्रतिनिधी गोविंद मानकरी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे आदी मान्यवर उपस्थित होते.

            या कार्यक्रमासाठी 150 ते 200 जनसामान्य व्यक्ती उपस्थित असून 05 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. उर्वरित परिपुर्ण प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवने यांनी मे 2023 अखेर परिपूर्ण सर्व प्रस्तावाची छाननी करुन जास्तीत जास्त जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवानंद मिनगीरे यांनी केले तर सुत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले.

 

*****

No comments: