जेष्ठ नागरिक व
ऊसतोड कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोली (जिमाका), दि. 12 : राज्यात सामाजिक
न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त
दिनांक 01 एप्रिल, 2023 ते 01 मे, 2023 या कालावधीत समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आलेले आहे. यानिमित्त आज दिनांक 12 एप्रिल, 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन, हिंगोली येथे जेष्ठ नागरिक व ऊसतोड कामगारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
घेण्यात आले. या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या
मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा पेन्शनर्स असोशिएशनचे अध्यक्ष मनोहर
लक्ष्मणराव पोपळाईत, कार्याध्यक्ष पांडुरंग गणपतराव गाडे, सेवानिवृत्त
मुख्याध्यापक लक्ष्मणराव तुकाराम भगत, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे,
डॉ.अजहर देशमुख, डॉ.शुभम पाटील, डॉ.फैजल खान, डॉ.गौतम वाघमारे, डॉ.निशांक मानका या
मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात
आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मनोहर लक्ष्मणराव पोपळाईत हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन पल्लवी गिते यांनी केले.
यावेळी
हिंगोली जिल्ह्यातील 200 ते 250 जेष्ठ नागरिक व ऊसतोड कामगार उपस्थित होते. हिंगोली
जिल्ह्यात प्रथमच 249 जेष्ठ नागरिक व ऊसतोड कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषध
गोळ्या वाटपासह आरोग्य उपचार करण्यात आले.
कार्यक्रम
यशस्वीतेसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
बार्टी, हिंगोली व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथील सर्व कर्मचारी यांनी
मोलाचे सहकार्य केले.
*****
No comments:
Post a Comment