11 April, 2023

 कृषि निविष्ठांच्या तक्रारीचे वेळीच निवारण करण्यासाठी

जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 :  खरीप हंगाम सन 2023 मध्ये शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि वेळेत गुणात्मक दर्जाच्या कृषि निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषि विभाग, हिंगोलीच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषि निविष्ठा विक्री केंद्रांची आणि कृषि निविष्ठांची तपासणी करण्यात येत असते. यानंतरही एखाद्या शेतकऱ्याला कृषि निविष्ठा विक्री केंद्रावरुन कृषि निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण अथवा खरेदी पश्चात खरीप हंगाम संपेपर्यंत कृषि निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता इत्यादी बाबतीत काही संशय आल्यास अथवा त्यामध्ये आपली फसवणूक झाली असे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारीचे वेळीच निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर एक व पाचही तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 06 तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

प्रत्येक तक्रार निवारण कक्षाचे ठिकाण व भ्रमणध्वनी क्रमांकाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष कृषि विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे स्थापन करण्यात आला आहे. त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक 9421490222 असा आहे.

तालुकास्तरीय तक्रार निवारणासाठी औढा नागनाथ तालुक्यासाठी कृषि विभाग, पंचायत समिती, औंढा नागनाथ येथे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक 8087889299 असा आहे. वसमत तालुक्यासाठी कृषि विभाग, पंचायत समिती  वसमत येथे स्थापन करण्यात आला असून त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक 9028905357 असा आहे. हिंगोली तालुक्यासाठी कृषि विभाग, पंचायत समिती, हिंगोली येथे स्थापन करण्यात आला असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9405323058 असा आहे. कळमनुरी तालुक्यासाठी कृषि विभाग, पंचायत समिती, कळमनुरी येथे स्थापन करण्यात आला असून त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक 7038473903 असा आहे. सेनगाव तालुक्यासाठी कृषि विभाग, पंचायत समिती, सेनगाव येथे स्थापन करण्यात आला असून त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक 9158121718 असा आहे.

संबंधित तालुक्यातील शेतकरी कृषि निविष्ठाबाबत आपली तक्रार त्वरित दूरध्वनीवरुन वरील नमूद संपर्क क्रमांकावर नोंदवू शकतात. तक्रारीचे स्वरुप पाहून शेतकऱ्यांनी संबंधित गुण नियंत्रण निरीक्षकांकडे/तक्रार निवारण कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रार अर्जासोबत कृषि निविष्ठांच्या खरेदीची पावती, सातबारा, होल्डींग इत्यादी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्यास लगेच कळविण्यात येईल. त्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रार अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, गांव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. या व्यतिरिक्त शेतकरी आपली तक्रार संबंधित तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदवावी, असे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****  

No comments: