ज्येष्ठ नागरिक, तृतीय पंथी व्यक्ती व ऊसतोड
कामगारांसाठी
12 एप्रिल रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 10 : सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागांतर्गत दि. 1 एप्रिल ते 1 मे, 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय समता पर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात येत आहे . त्यानिमित्त दि. 12 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता ज्येष्ठ
नागरिक, तृतीयपंथी व्यक्ती व ऊसतोड कामगार यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी व जनजागृतीसाठी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक नयाय भवन, दर्गा रोड, रिसाला बाजार हिंगोली येथे शिबीर
आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये जिल्ह्यातील सर्व
ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व्यक्ती, ऊसतोड कामगार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्यामार्फत
करण्यात आली आहे.
*****
No comments:
Post a Comment