कृषि उत्पन्न बाजार समिती मतदान व मतमोजणी केंद्रात
मोबाईल वापरण्यास बंदी
हिंगोली (जिमाका), दि. 27 : कृषि
उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पारदर्शक, भयमुक्त व निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी
आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या
(समितीची निवडणूक) नियम 2017 चे नियम 3 (चार) अन्वये मतदान व मतमोजणी कामाची
गोपनीयता भंग होणार नाही. यासाठी मतदान आणि मतमोजणी केंद्रामध्ये तसेच 100
मीटरच्या परिसरात मोबाईल, पेजर, इलेक्ट्रॉनिक डायरी, आयपॅड, टॅब व तत्सम
इलेक्ट्रॉनिक्स साहित्य वापरण्यास व जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
या आदेशाची मतदान व मतमोजणी केंद्रावरील नियुक्त करण्यात आलेले
अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश नवनाथ वगवाड, निवडणूक
निर्णय अधिकारी कृषि उत्पन्न बाजार समिती, हिंगोली तथा तहसीलदार, हिंगोली यांनी
दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment