13 April, 2023

 

हिंगोली जिल्ह्यात प्रथमच समाज प्रबोधन,जागृती,अंधश्रध्दा निर्मूलन,व्यसनमुक्ती विषयावर

नवनाथ गायकवाड यांचा संमोहन कार्यक्रम उत्साहात संपन्न

 




हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक 01 एप्रिल, 2023 ते 01 मे, 2023 या कालावधीत समतापर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त दि. 13 एप्रिल, 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे समाज प्रबोधन, जागृती, अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती उपाय योजनेसाठी संमोहन कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवाच्या प्रतिमेचे महाराष्ट्र राज्य समाज भूषण पुरस्कारार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार विजेते डॉ. विजय निलावार, उगम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पुणे सुप्रसिध्द संमोहन तज्ञ नवनाथ गायकवाड उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले.

यावेळी हिंगोली जिल्हाभरातून 250 ते 300 नागरिक उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यात प्रथमच असा संमोहन कार्यक्रम घेण्यात येऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बार्टी, हिंगोली व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

*****

No comments: