उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा
-
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी
उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व स्वत:चा बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात, असे
आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
काय करावे :-
- उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील
माहितीचा वापर करण्यात यावा.
- तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी
पिण्यात यावे.
- हलकी, पातळ
व सचिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री,
हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
- जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा
छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा
झाकण्यात यावा.
- शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक
इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.
- अशक्तपणा,
स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व
चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
- गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे
पाणी पिण्यास देण्यात यावे.
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा.
तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची
व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना
सूचित करण्यात यावे.
- पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात
यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
काय करु नये :-
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व
पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर
उन्हात जाण्याचे टाळावे. गडद,
घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
- बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे
टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.
- उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे.
(तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.)
- शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले
चहा, कॉफी,
मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इ. यांचा वापर टाळावा.
- शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins) असलेले अन्न टाळावे.
*****
No comments:
Post a Comment