24 April, 2023

 

बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरणासाठी पैशाची मागणी केल्यास

सरकारी कामगार अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

                                                                                                             

हिंगोली (जिमाका), दि.24 :महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची  नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी  योजानांचे लाभ हे संगणकीकृत प्रणालीद्वारे (Online) अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची छाननी / तपासणीअंती सदरचे लाभ हे थेट कामगारांच्या खात्यात जमा केले जातात.

ही कामे करुन देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे. सबब, सर्व बांधकाम कामगारांनी अशा कोणत्याही आमिष अथवा दबावास बळी पडू नये व अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन टी. ई. कराड, सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: