कयाधू नदी जनसंवाद यात्रा
समारोपीय कार्यक्रमात
जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंह
राणा यांचे 26 एप्रिल रोजी मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 25 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन, वन विभाग व उगम
ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यांचा अमृत
महोत्सवानिमित्त चला जाणूया नदीला अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात कयाधू व आसना
नदी जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती.
कयाधू नदी जनसंवाद यात्रेचा समारोपीय कार्यक्रम दि. 26 एप्रिल, 2023
रोजी सकाळी 9.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या
सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर हे उपस्थित राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून जलपुरुष तथा
अध्यक्ष जागतिक पूर आणि दुष्काळ निवारण आयोग व रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ.
राजेंद्रसिंह राणा उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, जलप्रेमी, नदी प्रेमी, नागरिक
यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या
वतीने करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment