क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संगीत रजनी
कार्यक्रम
हिंगोली (जिमाका), दि. 14 : महाराष्ट्र
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या
वतीने दिनांक 11 एप्रिल, 2023 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती
व विविध कार्यक्रम घेण्या बाबत आदेशित करण्यात आलेले आहे.
जयंती निमित्ताने क्रांतीसुर्य महात्मा
ज्योतिबा फुले चौक परिसरात मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा
फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे
प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सुनिल महेंद्रकर, चंदु लव्हाळे-जिल्हा अध्यक्ष,
समस्त माळी समाज तथा माजी नगरसेवक, मिलींद उबाळे, हर्षवर्धन परसवाळे, विशाल इंगोले,
डॉ.संजय नाकाडे, सिध्दार्थ गोवंदे , सत्यजीत नटवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सुप्रसिध्द ऑकेस्ट्रा स्वरगंधार शंतनु
पोले यांचे पथकानी सायकांळी 6.00 ते रात्री 10.00 वाजे पर्यंत क्रांतीसुर्य महात्मा
ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गित गायन करुन
सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक इंगोले
यांनी केले तर प्रास्ताविक शिवानंद मिनगीरे-सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांनी
केले.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी हिंगोली शहरातील
किमान 300 ते 350 प्रेक्षकगण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
इतर मागास बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बार्टी,हिंगोली
व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
****
No comments:
Post a Comment