11 April, 2023

 रास्त भाव दुकानदारांना मार्जिनची रक्कम अदा करण्याचे आदेश

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 :  कोरोना प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर ते डिसेंबर, 2022 (प्रत्यक्ष वितरण माहे ऑक्टोबर ते जानेवारी, 2023)  या कालावधीमध्ये वितरीत केलेल्या मोफत गहू व तांदूळ या पोटी शिधावाटप/रास्तभाव दुकानदार यांना देय असलेल्या मार्जिनची रक्कम वितरीत करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अनुदान उपलब्ध करुन दिलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांनी  जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना सर्व रास्तभाव दुकानदारांना मार्जिनची रक्कम वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.

तालुकानिहाय रास्तभाव दुकानदारांना मार्जिनची रक्कम वितरण करण्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

औंढा नागनाथ तहसील कार्यालयासाठी 28 लाख 36 हजार 982 रुपये, वसमत तहसील कार्यालयासाठी 44 लाख 32 हजार 02 रुपये , हिंगोली तहसील कार्यालयासाठी 35 लाख 15 हजार 09, कळमनुरी तहसील कार्यालयासाठी 32 लाख 39 हजार 367, तर सेनगाव तहसील कार्यालयासाठी  31 लाख 25 हजार 552 रुपये याप्रमाणे वितरीत करण्यात आली आहे.

वरील प्राप्त रक्कम शीघ्र गतीने रास्तभाव दुकानदारांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  

*****   

No comments: